लाहोर : पाकिस्तानच्या न्यायलयाने मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला सोडण्याचे आदेश दिल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा पंजाब सरकारच्या आदेशाला स्थगिती देऊन लाहोर उच्च न्यायालयाने त्याची सुटका करण्याचे आदेश दिलेत.
या सुटकेबाबत भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकार लख्वीविरोधात संवेदनशील अभिलेख सादर करण्यास अपयशी ठरल्याने त्याच्या स्थानबद्धतेला स्थगिती देण्यात आली आहे. सुटकेसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा जामीन सादर करण्याची अट न्यायालयाने घातली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.