सौदीत क्षुल्लक कारणावरून भारतीयाची निर्घृण हत्या

सौदी अरेबियात एका भारतीयाची क्षुल्लक कारणावरून गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. 

Updated: Jul 16, 2016, 03:32 PM IST
सौदीत क्षुल्लक कारणावरून भारतीयाची निर्घृण हत्या title=

रियाध : सौदी अरेबियात एका भारतीयाची क्षुल्लक कारणावरून गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. 

४५ वर्षीय नझीर हे सौदी अरेबियात रेस्टॉरन्ट चालवत होते. ते मूळचे केरळचे... तिरुअनंतपुरममधल्या अट्टिंगलजवळच त्यांचं गाव आहे. 

गुरुवारी रात्री तीन इसमांनी त्यांच्या रेस्टॉरन्टमध्ये जेवण घेतलं. जेवल्यानंतर बील भरताना नझीर आणि या तिघांमध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली... यामुळे भडकलेल्या या तिघांनीही रेस्टॉरन्टमधून रागातच काढता पाय घेतला... आणि काही वेळाने ते तिथं परत दाखल झाले... रिव्हॉल्व्हरसहीत... 

पुन्हा रेस्टॉरन्टमध्ये येऊन त्यांनी नझीरवर गोळीबार केला. यात नझीर हे जागीच ठार झाले. त्यांच्यामागे त्यांची पत्नी सना आणि तीन मुलं आहेत.