कॅनबेरा : पती आणि पत्नीचे नाते जन्मोजन्मीचे असते असे म्हटले जाते. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. पण पतीची हत्या करणाऱ्या एक पत्नीची अशी आहे, तिची काहणी ऐकल्यावर आपल्या अंगावर काटा येईल. ऑस्ट्रेलियातील एका पत्नीने आपल्या पतीला निष्ठूरतेने ठार मारले आणि त्याला शिजवून खाण्याच्या तयारी होती.
इंग्रजी वेबसाइट डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार ही घटना मे महिन्यातील आहे, पण त्याची सुनावणी आज झाली. ऑस्ट्रेलियातील कॅथरीन नावाच्या महिलेने आपला पतीन जॉन चार्ल्स थॉमस याला एक दोनदा नाही तर तब्बल ३७ वेळा चाकूने हल्ला केला. एवढे करून आपला राग शांत झाला नाही. त्याने पतीच्या मृतदेहाला एका इलेक्ट्रीक शेगडीवर ठेवले आणि शिजवले. शिजवलेल्या पतीच्या मृतदेहाला खाण्याच्या तयारी असताना पोलिसांनी तिला पकडले आणि अटक केली.
या महिला आज झालेल्या सुनावणीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.