30 जून असेल सर्वात मोठा दिवस

Updated: Jun 29, 2015, 12:03 PM IST
30 जून असेल सर्वात मोठा दिवस title=
वॉशिंग्टन : 30 जून म्हणजेच उद्याचा दिवस थोडा मोठा असणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)नेही याला अधिकृतरित्या दुजोरा दिलाय. प्रत्येक दिवसात 86,400 सेकंद असतात, पण 30 जूनला एक अतिरीक्त लीप सेकंद जोडला गेल्यामुळे इतर सामान्य दिवसांपेक्षा हा दिवस थोडा मोठा असणार आहे.
 
"पृथ्वीच्या परिक्रमेचा वेग हळूहळू कमी होत चालला आहे, त्यामुळे यात अतिरीक्त लीप सेकंद जोडला गेलाय." असं नासाच्या मेरीलँडमधील गोडार्ड स्पेस फ्लाइट केंद्रातील डॅनिअल मॅकमिलन यांनी सांगितलंय. हा फरक कोऑर्डिनेटेड युनिवर्सल टाइम अर्थातच यूटीसीमध्ये असणार आहे, ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो.
 
यूटीसी अॅटोमिक टाईम असून एका सेकंदाचा अवधी सिसियमच्या अॅटम्समध्ये होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रांझिशनवर आधारीत असते. हे ट्रांझिशन इतके विश्वासार्ह असतात की सिसियम ब्लॉक 1,400,000 वर्षे अचूक असू शकतात. पृथ्वी, चंद्र आणि सूर्यामधील गुरूत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा वेग मंदावल्याचे नासाने स्पष्ट केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.