मुलासाठी मागितली जॅकी चँनने माफी

हॉलिवूडचा सुपर स्टार जॅकी चँनने आपला मुलगा जयसीसाठी माफी मागितली आहे. अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी जयसी याला बीजिंगमध्ये अटक करण्यात आली आहे.  

Updated: Aug 21, 2014, 03:45 PM IST
 मुलासाठी मागितली जॅकी चँनने माफी title=

बीजिंग: हॉलिवूडचा सुपर स्टार जॅकी चँनने आपला मुलगा जयसीसाठी माफी मागितली आहे. अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी जयसी याला बीजिंगमध्ये अटक करण्यात आली आहे.  

सरकारी सीआरआय रेडिओने दिलेल्या बातमीनुसार, मुलाच्या कृत्याबद्दल हाताशता आणि नाराजी जॅकी चँनने व्यक्त केली आहे. माझा मुलगा चुकीच्या मार्गावर आहे. त्याने आपल्या चुकीची शिक्षा भोगली पाहिजे तसेच आपल्या वडिलांप्रमाणे एक जबाबदार नागरीक बनले पाहिजे.  

जयसी (३२) हा तायवानची एक चित्रपट अभिनेत्री चेन तुंग (२३) हिच्या सह आपल्या घरात मादक द्रव्याचे सेवन करताना अटक करण्यात आली. फांग जुमिंग नावाने चर्चित असलेल्या जयसीकडे चरस सापडली होती. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयसी आणि तुंग दोघांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी चँन यांच्या निवासस्थानी १०० ग्रॅम चरस सापडली आहे. जयसी  याच्यावर मादक द्रव्य सेवनाचा आणि दुसऱ्या व्यक्तीला आपल्या घरी असे कृत्य करण्याची परवानगी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

विशेष म्हणजे २००९ मध्ये चायना नॅशनल एन्टी ड्रग कमेटीच्या सद्भावना राजदूत म्हणून जॅकी चँन यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल यासाठी सर्वांची माफी मागितली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.