हक्कानी नेत्यांची सूचना देणाऱ्यांना ३ कोटी डॉलरचे बक्षिस

 दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या पाच मोठ्या नेत्यांची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने सुमारे ३ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय चलनात याची किंमत १,८२,०४,००,००० रुपये इतकी आहे. या दहशतवादी संघटनेवर अफगाणिस्तानातील अनेक नागरिक आणि नाटोच्या सैनिकांच्या हल्ल्याचा आरोप आहे. 

Updated: Aug 21, 2014, 02:39 PM IST
हक्कानी नेत्यांची सूचना देणाऱ्यांना ३ कोटी डॉलरचे बक्षिस title=

वॉशिंगटन:  दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या पाच मोठ्या नेत्यांची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने सुमारे ३ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय चलनात याची किंमत १,८२,०४,००,००० रुपये इतकी आहे. या दहशतवादी संघटनेवर अफगाणिस्तानातील अनेक नागरिक आणि नाटोच्या सैनिकांच्या हल्ल्याचा आरोप आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, पाकिस्तान आधारित हक्कानी नेटवर्क  तालिबानशी जोडला गेला आहे. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी २०१२ मध्ये हक्कानी संघटनेला दहशतवादी नेटवर्क घोषित केले आहे.

अमेरिकेच्या न्याय कार्यक्रमाच्या पुरस्कारांर्गत परराष्ट्र विभागाने या बक्षिसाची घोषणा केली आहे. यात अजीज हक्कानी, खलील  अल-रहमान हक्कानी, याहया हक्कानी आणि अब्दुल रऊफ जाकीर यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना ५०-५० लाख डॉलरचे बक्षीस देणार आहे.  

या समूहाचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्याबाबत सूचना देणाऱ्या  १ कोटी डॉलरचं बक्षीस देण्याची घोषणा केली. त्याच्यावर यापूर्वीच ५० लाख डॉलरचं बक्षीस होते. 

सिराजुद्दीन हा हक्कानी नेटवर्कचे संस्थापक जलालुद्दीन यांचा मुलगा आहे. त्याने २००८मध्ये काबुलच्या सेरेना हॉटेलवर हल्ल्याचा कट रचला होता. या हल्ल्यात एक अमेरिकन नागरिक आणि पाच इतर जणांचा मृत्यू झाला होता. सरकारने २००८मध्ये त्याला विशेष दहशतवादी घोषीत केले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.