इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या कुत्र्याला अटक

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पाळीव कुत्र्याला चावा घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आलीये. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान बेंजामिन यांनी स्वत: याची माहिती दिलीये.  बेंजामिन यांनी हन्नुकाह सणाच्या निमित्ताने निवासस्थानी पार्टीचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांच्या कुत्र्याने लिकुड पार्टीचे खासदार शरीन हॉक्सेल यांचा चावा घेतला. 

Updated: Dec 13, 2015, 12:42 PM IST
इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या कुत्र्याला अटक title=

येरुस्लेम : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पाळीव कुत्र्याला चावा घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आलीये. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान बेंजामिन यांनी स्वत: याची माहिती दिलीये.  बेंजामिन यांनी हन्नुकाह सणाच्या निमित्ताने निवासस्थानी पार्टीचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांच्या कुत्र्याने लिकुड पार्टीचे खासदार शरीन हॉक्सेल यांचा चावा घेतला. 

बेंजामिन यांच्या कुत्र्याने उपपराष्ट्रमंत्र्यासह आणखी दोन जणांचाही चावा घेतला होता. काइया असे या कुत्र्याचे नाव आहे. याबाबतची माहिती फेसबुकवर दिलीये

'इच्छा नसतानाही आम्हाला आमच्या दहा वर्षाच्या कुत्र्याला द्यावे लागले.', असे बेंजामिन यांनी म्हटले आहे.  कायद्यानुसार पुढील दहा दिवस या कुत्र्याला निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. याच वर्षी जुलैमध्ये बेंजामिन यांच्या मुलाने या कुत्र्याला रेस्क्यू होममधून आणले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.