अतिरेकी संघटना आयएसचा क्रूरपणा, महिलांवर 'सेक्स गुलाम'साठी जबरदस्ती

जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी गट इस्लामिक स्टेटचा (आयएस) दहशतवादी क्रूरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रभावाखालील क्षेत्रात महिलांना 'सेक्स गुलाम' होण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत.

Reuters | Updated: Aug 21, 2015, 03:18 PM IST
अतिरेकी संघटना आयएसचा क्रूरपणा, महिलांवर 'सेक्स गुलाम'साठी जबरदस्ती title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी गट इस्लामिक स्टेटचा (आयएस) दहशतवादी क्रूरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रभावाखालील क्षेत्रात महिलांना 'सेक्स गुलाम' होण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यू यॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार आता महिलांना सेक्स गुलाम होण्यास भाग पाडले आहे. महिलांना सेक्स गुलाम सारखे वागविले जात आहे.

अधिक वाचा : ISISने क्रूरतेची परिसीमा, छाटले १२ जणांचे मुंडके

आयएस या दहशतवादी संघटनेने सीरियातील एक तृतीयांश लोकांना ठार केले आहे. ते महिला आणि मुलींना सेक्स गुलाम म्हणून ठेवून घेत आहेत. त्यांच्यावर जुलूम केले जात आहेत. तसेच महिलांची खरेदी केली जात आहे. तर मुली आणि महिलांना जबरदस्तीने सेक्स गुलाम होण्यासाठी मजबूर केले जात आहे. या दहशतवादी गटाची क्रूरता गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.

अधिक वाचा - लज्जास्पद : शॉवरखाली अंघोळ करणाऱ्या महिलांचे छुप्या कॅमऱ्याने शुटिंग

इराक आणि सीरियात आयएसच्या क्षेत्रात यौन हिंसा सुरुच आहे. यामध्ये मुलींना टार्गेट करण्यात येत आहे. अल्पसंख्यांक समुदायालावर जुलूम करण्यात येत आहे. त्यांनाच लक्ष करण्यात येत आहे. यात ११ वर्षांच्या मुलींना शिकार केले जात आहे. त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे. त्यांना सेक्स गुलाम म्हणून ठेवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केले जात आहेत. 

दरम्यान, इराकमधील २१ महिला आणि मुलींना त्यांनी बंधक बनविले होते. या महिलांनी आपली कधीबशी सुटका करुन पळ काढला. त्यांनीच आयएसची क्रूरता जगासमोर आणली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.