रशियाच्या विमानाचा तो अपघात नव्हता तर 'घात' होता - इसिस

रशियाच्या विमानाला अपघात झाला नाही तर तो घडवून आणला गेलाय. ही कबुली दिलीय 'इसिस'नं... सोबतच, इसिसनं या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारलीय. 

Updated: Oct 31, 2015, 08:34 PM IST
रशियाच्या विमानाचा तो अपघात नव्हता तर 'घात' होता - इसिस title=

नवी दिल्ली : रशियाच्या विमानाला अपघात झाला नाही तर तो घडवून आणला गेलाय. ही कबुली दिलीय 'इसिस'नं... सोबतच, इसिसनं या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारलीय. 

रशियाच्या विमानाला इजिप्तमध्ये सिनाई इथं घडवून आणलेल्या या अपघातात विमानात प्रवास करणारे सर्व म्हणजेच 224 प्रवाशांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये विमानातील सात क्रू मेम्बर्स आणि 17 लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेला इजिप्तच्या पंतप्रधान कार्यालयानंही दुजोरा दिलाय. 

अधिक वाचा - रशियाच्या विमानाला अपघात; विमानातील 224 प्रवासी जागीच ठार
 
मिळालेल्या माहितीनुसार हे विमान कोगलीमाविया कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड होतं. एअरबस ए 321 ची फ्लाईट 'केजीएल 9268' इजिप्तच्या शर्म अल शेखहून रशियाच्या सेंट पीटसबर्ग इथं जात होतं.

विमानानं हवेत उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर ट्राफिक कंट्रोलशी या विमानाचा संपर्क तुटला. या विमानात अधिकतर रशियाचे प्रवासी होते. सकाळी 6.30 वाजल्याच्या दरम्यान या विमानानं उड्डाण घेतलं होतं. दुपारी 12.10 च्या सुमारास हे विमान इच्छित स्थळी पोहचणार होतं. उड्डाण घेतल्यानंतर जवळपास 23 मिनिटांनी या विमानानं तुर्कीच्या एअर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क साधणं अपेक्षित होतं... पण, असं झालं नाही. यापूर्वीच मिस्रच्या एटीसी रडारहून हे विमान गायब झालं होतं.  

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.