२ मिनिट न्यूडल्स बनवता मुलांना 'गे', इंडोनेशियातील मेअरचा धक्कादायक दावा

 इंडोनेशियातील तांगेरं शहराच्या महापौरांनी एक धक्कादायक विधान केले आहे. दूध आणि इन्सटंन्ट न्यूडल्स  खाल्याने लहान मुलं 'गे' होतात, असा धक्कादायक विधान केले आहे. 

Updated: Mar 11, 2016, 06:11 PM IST
२ मिनिट न्यूडल्स बनवता मुलांना 'गे', इंडोनेशियातील मेअरचा धक्कादायक दावा  title=

तांगेरंग :  इंडोनेशियातील तांगेरं शहराच्या महापौरांनी एक धक्कादायक विधान केले आहे. दूध आणि इन्सटंन्ट न्यूडल्स  खाल्याने लहान मुलं 'गे' होतात, असा धक्कादायक विधान केले आहे. 

इंडोनेशियाच्या मुलांना हेल्दी, स्मार्ट आणि स्पर्धक बनविण्यासाठी त्यांना पोशक तत्वे दिली पाहिजे. त्यामुळे आईचं दूध हे महत्त्वाचे आहे, असे आरिफ आर. विसमॅनसिह यांनी शहरात एका प्रेग्नंसी सेमिनारमध्ये बोलताना सांगितले. 

आजकाल मुलांचे पालक खूप बिझी झाले आहेत. त्यामुळे त्यांना त्याच्या मुलांना भरवायला वेळ नाही. ते त्यांच्या मुलांना झटपट आणि लवकर होणारे अन्नपदार्थ खाऊ घालतात. त्यामुळे मुलांचा विकास होत नाही. त्यामुळे आश्चर्य नाही की मुलं गे होत आहेत. 

महापौर यांच्या धक्कादायक वक्तव्यापूर्वी इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री यांनी एलजीबीटी (गे मोहीम) बद्दल म्हणाले की गे चळवळ ही अण्वस्त्रापेक्षा खूप घातक आहे. 

तर इंडोनेशियाचे संशोधन आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणाले की, एलजीबीटी (समलैंगिक संबंध ) विद्यार्थ्यांना विद्यापीठांत बंदी घालण्यात यावी...