शोषणाविरोधात आवाज उठवण्यास भारतीय महिला सर्वात आघाडीवर-सर्वे

जी २० देशांमध्ये भारतातील महिलांना कामाची ठिकाणी असमान व्यवहाराचा सामना करावा लागतो, मात्र भारतीय महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आघाडीवर आहेत.

Updated: Oct 14, 2015, 06:50 PM IST
शोषणाविरोधात आवाज उठवण्यास भारतीय महिला सर्वात आघाडीवर-सर्वे title=

लंडन : जी २० देशांमध्ये भारतातील महिलांना कामाची ठिकाणी असमान व्यवहाराचा सामना करावा लागतो, मात्र भारतीय महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आघाडीवर आहेत.

थॉम्सन रॉयटर्स फाउंडेशन आणि द रॉकफेलर फाउंडेशनयांनी इप्सोस मोरीच्या माध्यमातून 9500 पेक्षा जास्त महिलांची मतं मागवली, त्यानुसार जास्तच जास्त भारतीय महिलांना कामाच्या ठिकाणी मोठी संधी अथवा समान संधी लाभत नाही, ही मोठी अडचण असल्याचं समोर आलं आहे. 

जी २० देशांचं कामकाज करणाऱ्या महिलांच्या पाच प्रमुख समस्या आहेत. ऑफिसचं काम आणि जीवन यांच्यातील संतुलन राखण्याची मोठी अडचण आहे. ५७ टक्के महिलांच्या मते त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे.

भारतात महिलांच्या शोषणासंबंधी आश्चर्यजनकबाब समोर आली आहे, अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, २७ टक्के महिलांचं म्हणणं आहे की, कामाच्या ठिकाणी शोषण सहन करावं लागतं, जी २० देशांमधील महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात भारतीय महिला सर्वात पुढे आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.