१६ वर्षानंतर भाऊ भेटल्याने भारतीय महिलेचा `हार्ट अटॅक`नं मृत्यू

एका भारतीय महिलेचा लाहोर रेल्वे स्थानकावर हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

Updated: Apr 16, 2014, 07:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
एका भारतीय महिलेचा लाहोर रेल्वे स्थानकावर हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. सरला जेवटराम बदलानी आणि त्यांच्या भावाची १६ वर्षानंतर पाकिस्तानच्या लाहोर रेल्वे स्थानकावर भेट झाली. या भेटण्याचा आनंदातच सरला यांना हृद्य विकाराचा हृद्य विकाराचा धक्का आला.
विशेष म्हणजे सरला यांच्या पासपोर्टवर उल्हासनगरचा पत्ता आहे. सरला यांचे भाऊ कूमार यांच्या सांगण्यानुसार सरला यांचा वीजा चार वेळा रद्द करण्यात आला होता. पण पाचव्यांदा प्रयत्न केल्यावर त्यांचा वीजा मंजूर करण्यात आला होता. यामुळेच १६ वर्षानंतर सरला यांना आपल्या भावाला भेटून भावुक झाल्या. यातच त्यांना हृद्य विकाराचा धक्का आला.
कुमार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आणि त्यांच्या परिवाराला लवकरच वीजा मंजूर करावा, म्हणजे त्यांना लवकरच सरला यांच्या अंतिम दर्शनाला जाता येईल. इस्लामाबादचे भारतीय उच्चायुक्ताचे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने कुमार यांच्या परिवाराला लवकरच वीजा देण्यात येईल, असे सांगितले आहे. मानवता आणि चिकित्सीय आधारावर नेहमी वीजा देण्यात प्राथमिकता देता येते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.