भारताचा रुपया या देशांच्या चलनापेक्षा आहे 'मजबूत'!

तुम्ही परदेशात फिरायला जाण्याच्या अगोदर तुमचा खिसा आणि बँक बॅलन्स नक्की चेक करत असाल... अर्थातच होय... पण, काही देश असेही आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला खिशाची चिंता करावी लागणार नाही. कारण, या देशांतील चलनापेक्षा भारतीय 'रुपया' खूपच मजबूत आहे. त्यामुळे, खर्चाचा फारसा परिणाम तुमच्या खिशावर पडणार नाही.

Updated: Dec 17, 2015, 11:48 PM IST
भारताचा रुपया या देशांच्या चलनापेक्षा आहे 'मजबूत'! title=

मुंबई : तुम्ही परदेशात फिरायला जाण्याच्या अगोदर तुमचा खिसा आणि बँक बॅलन्स नक्की चेक करत असाल... अर्थातच होय... पण, काही देश असेही आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला खिशाची चिंता करावी लागणार नाही. कारण, या देशांतील चलनापेक्षा भारतीय 'रुपया' खूपच मजबूत आहे. त्यामुळे, खर्चाचा फारसा परिणाम तुमच्या खिशावर पडणार नाही.

व्हिएतनाम
आशिया खंडातच येणाऱ्या व्हिएतनामचं चलन आहे 'डोंग'... इथं तर तुम्ही आरामात आपल्या कुटुंबालाही घेऊन जाऊ शकता. कारण भारताचा 'एक रुपया' म्हणजे तब्बल '३३८.३५ डोंग' होतात.

बेलारुस
पूर्व युरोपमध्ये येणारा बेलारुस हा एक देश... भारतीय रुपयाच्या मानानं इथलं चलन खुपच स्वस्त आहे. इथं तुम्हाला एका रुपयांच्या मोबदल्यात तब्बल २१६ रुबल मिळतील.

इंडोनेशिया
आशियाई देश इंडोनेशियाचं चलन आहे 'रुपईया'... इथं तुम्हाला एका रुपयाच्या मोबदल्यात २०४.७६ रुपईया मिळतात. 

पेराग्वे 
दक्षिण अमेरिकेत मोडणाऱ्या पेराग्वेचं चलन आहे 'गुआरानी'... एक रुपया म्हणजे ७४.२६ गुआरानी होतात. 

कम्बोडिया
लोकसंख्येच्या दृष्टीनं कम्बोडियाचा जगात ७० वा क्रमांक लागतो. इथलं चलन आहे रील... एक रुपया म्हणजे तब्बल ६३.९३ रील.

मंगोलिया 
मंगोलियाचा उत्तर भाग रशियाला लागून आहे. तर दक्षिण, पूर्ण आणि पश्चिम भाग चीनला जोडलेला आहे. इथलं चलन आहे 'तुगरिक'... एक रुपया म्हणजे २९.८३ तुगरिक

कोस्टा
समुद्र तट, ज्वालामुखी आणि जैविक विविधतेनं नटलेला हा एक प्रसिद्ध देश... कोस्टाचं चलन 'कोलोन्स'... एका रुपयाच्या मोबदल्यात ८.१५ कोलोन्स मिळतील.

हंगरी
मध्य युरोपीय देश असलेल्या हंगरीचं चलन आहे 'फोरिंट'... एक रुपया म्हणजेट ४.२२ फोरिंट

जपान
भारतापेक्षा जास्त विकसित आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध मानल्या जाणाऱ्या जपानचं चलन आहे 'येन'... भारताचा एक रुपये म्हणजे १.८४ येन होतात.

मग, तुम्ही कोणत्या देशात फिरायला जायचा प्लान करताय.