विद्यार्थ्याला दारू पाजून शिक्षिकेनं केले अत्याचार, २ वर्षांची शिक्षा

डिस्लेक्सियानं ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यासोबत सेक्स करण्यासाठी त्याला अनेक सुविधा देणाऱ्या भारतीय वंशांच्या शिक्षिकेला दोन वर्षाची शिक्षा झालीय. ब्रिटिश कोर्टानं शिक्षिकेला १० वर्षांसाठी सेक्स गुन्हेगार म्हणूनही घोषित केलंय.

Updated: Jan 18, 2015, 09:19 AM IST
विद्यार्थ्याला दारू पाजून शिक्षिकेनं केले अत्याचार, २ वर्षांची शिक्षा title=

लंडन: डिस्लेक्सियानं ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यासोबत सेक्स करण्यासाठी त्याला अनेक सुविधा देणाऱ्या भारतीय वंशांच्या शिक्षिकेला दोन वर्षाची शिक्षा झालीय. ब्रिटिश कोर्टानं शिक्षिकेला १० वर्षांसाठी सेक्स गुन्हेगार म्हणूनही घोषित केलंय.

बर्मिंघन क्राउन कोर्टनं सांगितलं की, अमरदीप भोपारीनं १६ वर्षीय विद्यार्थ्याला दारू पाजली आणि अश्लिल संदेश पाठवल्यानंतर त्याच्यासोबत  सेक्स केला. 'बर्मिंघम मेल' नावाच्या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार २८ वर्षीय शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबत आपली कार, घर आणि शाळेजवळील इंडस्ट्रीअल इस्टेटमध्येही सेक्स केलाय. शाळेत शिकणारा १६ वर्षीय विद्यार्थी डिस्लेक्सिया नावाच्या आजारानं ग्रासलेला आहे. 

इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड्स परिसरात राहणाऱ्या भोपारीनं मुलाला अनेक गिफ्ट्स दिले आणि आपली कारही चालवायला दिली. बातमीनुसार तिनं विद्यार्थ्याला वाढदिवशी एका हॉटेलमध्ये नेऊन भरपूर दारू पाजली. जेव्हा विद्यार्थ्याच्या आयुष्यात त्याच्या वयाची मुलगी आली तेव्हा त्यानं शिक्षिकेसोबत असलेले संपविण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षिकेनं त्यास नकार दिला. भोपारीनं आपल्यावरील आरोप स्वीकारलेत. तिला डिसेंबर २०१४मध्ये अटक करण्यात आली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.