'सिस्को इंडिया'त काम करतायत १३२ करोडपती!

अमेरिकेचं नेटवर्क इक्विपमेंट बनवणाऱ्या 'सिस्को इंडिया' या कंपनीत काम करणाऱ्या करोडपतींची संख्या आता १३२ पोहचलीय. एका वर्षापूर्वी या कंपनीत केवळ तीन करोडपती होते. 

Updated: Jan 16, 2015, 01:10 PM IST
'सिस्को इंडिया'त काम करतायत १३२ करोडपती! title=

बंगळुरू : अमेरिकेचं नेटवर्क इक्विपमेंट बनवणाऱ्या 'सिस्को इंडिया' या कंपनीत काम करणाऱ्या करोडपतींची संख्या आता १३२ पोहचलीय. एका वर्षापूर्वी या कंपनीत केवळ तीन करोडपती होते. 

आपल्या कंपनीत कर्मचारी टिकून राहण्यासाठी या कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ केलीय. कंपनीनं १.१७ अरब डॉलरची गुंतवणूकही केलीय. या कंपनीला सध्या लोकल आणि इंटरनॅशनल मार्केटमधून सर्वोत्तम इंजिनिअरिंग आणि सेल्स टॅलेन्ट आपल्यात सामावून घ्यायचंय. 

'सिस्को सिस्टम्स'च्या डायरेक्टर, ह्युमन रिसोर्सेस, साऊथ एशिया, सीमा नायर यांनी म्हणण्यानुसार, कंपनी काही वर्षांपर्यंत परदेशी टॅलेंटवर अवलंबून होती. परंतु, आता मात्र भारतातच हे टॅलेंट उपलब्ध होतंय. कंपनीला भारतातच लोकल लीडर्स बनवायचेत आणि त्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजीटल इंडिया' कार्यक्रमाचा फायदा घेण्याचा विचार या कंपनीत प्रामुख्यानं सुरू आहे. 
 
गेल्या वर्षात सिस्को इंडियामधून चार मोठे एक्झिक्युटिव्हजनं नोकरी सोडलीय. यामध्ये, भारताचे अधिकारी हेड जेफ वाइट यांचाही समावेश होता.

सिस्कोमध्ये सर्वात जास्त पगार मिळवणाऱ्या इंजिनिअरचा पगार वार्षिक सात करोड रुपये आहे... त्याला गेल्यावर्षीपर्यंत १.३५ करोड रुपयांचा वार्षिक पगार मिळत होता. 'सिस्को'नं इतर कर्मचाऱ्यांनाही याच पद्धतीनं भरघोस पगारवाढ दिलीय.

महत्त्वाचं म्हणजे, याच 'सिस्को'नं ऑगस्ट २०१३ मध्ये जगभरात ४००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.