बोस्टन : तुम्ही केवळ चार तासात आता लंडनवारी करु शकतो. तुम्हाला हे खोटं वाटेत असेल. पण ते शक्य होणार आहे. भारतीय वंशाच्या इंजिनिअरांसमवेत अन्य इंजिनिअरर्सचा एक गट सुपरसोनिक लक्झरी विमान विकसित करत आहे, जे फक्त ४ तासात भारत ते लंडन अंतर कापू शकेल.
बोस्टनच्या स्पाइक ऐरोस्पेस या विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीने २०१३ साली एस-५१२ सुपरसोनिक विमान लॉन्च केले होते पण आत्ताच या कंपनीने त्याच्या डिझाईनमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे.
आधी या विमानाचा वेग ताशी १८५० किलोमीटरच्या जवळपास होता. डिझाईनमध्ये बदल केल्यामुळे या विमानाची गती अजून वाढली आहे. हे विमान १.८ मॅक (२२०५ किलोमीटर प्रती तास) च्या वेगाने धावेल असा कंपनीने दावा केला आहे. हा वेग आवाजाच्या गतीपेक्षा १.८ पटीने अधिक आहे.
या विमानात नव्यान् डिझाईन केलेले 'डेल्टा' पंखे लावले गेले आहेत. यामुळे एस-५१२ ची गतीची क्षमता वाढली आहे. याचबरोबर विमानाच्या मागील भागातही थोडे बदलाव केले आहेत, असे कंपनीचे वरिष्ठ इंजिनिअर अनुतोष मोइत्रा यांनी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.