वॉशिंग्टन : भारतात मागील अनेक दिवसांपासून काळ्या पैशांचा मुद्दा गाजतोय, मात्र भारत हा काळ्या पैशात जगात तिसरा असल्याचं एका संस्थेनं म्हटलं आहे.
काळ्या पैशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक असल्याचे अमेरिकास्थित लोबल फायनान्शिअल इंटीग्रिटी म्हणजेच एफटीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.
परदेशात तसेच देशात सर्वाधिक काळा पैसा असलेल्या देशांच्या यादीत भारत तिस-या स्थानी असल्याचे अमेरिकास्थित ग्लोबल फायनान्शिअल इंटीग्रिटी कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
२०१२मध्ये भारतातून सुमारे ९४.७६ अब्ज अमेरिकन डॉलर(म्हणजेच सहा लाख कोटी रुपये) इतका काळा पैसा परदेशांमध्ये गेला.
तर २००३ ते २०१२ या दशकभरात भारतातून सुमारे २८ लाख कोटी रुपये इतका काळा पैसा देशाबाहेर गेल्याचे एफटीआयने सांगितले.
या यादीत चीन पहिल्या स्थानी आहे तर रशिया दुस-या क्रमांकावर आहे. गुन्हे, भ्रष्टाचार आणि कर चुकवेगिरी या मार्गांनी जगातील उद्योन्मुख आणि विकसनशील देशांमधून २०१२ मध्ये ९९१.२अब्ज अमेरिकन डॉलर इतका काळा पैसा देशांबाहेर गेला आहे. यामध्ये भारताचा १० टक्के वाटा आहे.
परदेशातील काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी भारत सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.