भारत-चीन दरम्यान २४ करांरांवर पंतप्रधानांच्या स्वाक्षऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनची राजधानी बिंजिंगमध्ये आहेत. बीजिंगमधल्या 'हॉल ऑफ पीपल'मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

Updated: May 15, 2015, 11:57 AM IST
भारत-चीन दरम्यान २४ करांरांवर पंतप्रधानांच्या स्वाक्षऱ्या  title=

बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनची राजधानी बिंजिंगमध्ये आहेत. बीजिंगमधल्या 'हॉल ऑफ पीपल'मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

यावेळी, पंतप्रधान मोदी आणि चीनचे पंतप्रधान ली कुआंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जवळपास २४ करारांवर दोघांनी स्वाक्षऱ्या केल्या. पेइचिंगमध्ये दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेत सीमे संबंधी प्रश्न, गुंतवणूक आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत एकमेकांना सहयोग करण्याबद्दल चर्चा झाली.  

यामध्ये रेल्वे, मायनिंग, पर्यटन, अंतराळ संशोधन तसंच व्होकेशनल एज्युकेशन यांसंबंधी चर्चा झाली. चीन भारतात चेन्नई शहरात तर भारत चीनच्या शेंग्दू या शहरात एक-एक वाणिज्य दूतावास खोलण्यावर दोन्ही देशांची सहमती मिळाली. दूरदर्शन तसंच चीनचं सरकारी टीव्ही CCTV दरम्यान प्रसारणासंबंधीही करार झालाय. या करारानंतर भारत - चीन दरम्यान व्यापारिक संतुलन साधण्यात मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जातेय.   

बीजिंगमधील आजच्या वास्तव्यादरम्यान मोदी प्रतिष्ठीत सिंगुआ विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.  तसंच चीनी पंतप्रधानांमवेत योगा आणि ताईची चीनी मार्शल आर्टचं संयुक्त प्रात्यक्षिकही पाहणार आहेत. संध्याकाळी ते शांघायकडे रवाना होतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौ-याचा आजचा दुसरा दिवस.. कसा आहे मोदींच्या दौ-याचा आजचा दिवस पाहुयात... 

  • स. 9:15 - चर्चेनंतर करारावर स्वाक्षरी

  • स. 9:30 - मीडियाशी संवाद

  • स. 9:50 - स्टेट लेवल फोरममध्ये मोदींचं भाषण

  • स. 10 - पंतप्रधान ली कूआंन्ग यांच्यासह शाही भोजन

  • दु. 12:30 - ग्रेट हॉल ऑफ पीपुलमध्ये मोदी-जियांग भेट

  • दु. 1:30 - शिघुआ युनिवर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

  • दु. 2:45 - टेंपल ऑफ हेवनमध्ये योगा कार्यक्रमात सहभाग.

  • सं. 6:10 - शांघाईकडे रवाना

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.