मेलबर्न : तुम्ही कधी या गोष्टीवर विश्वास ठेवाल का? कुत्रा लवकर माणसांशी मिळते जुळते घेतो किंवा तो ईनामदार का होतो? त्याचे उत्तर आहे, लव्ह हॉर्मोन.
'प्रेम संप्रेरक' ('लव हॉर्मोन' ऑक्सिटोसिन) हे कार्ये करणारे पिट्यूइटरीचे संप्रेरक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रेम वाढीला लागते आणि कुत्रा माणसाळतो, असे सांगितले जाते. याबाबत मॅग्झीन 'अॅनिमल कॉग्निशन'मध्ये मांडलेल्या संशोधनात्मक लेखात म्हटले आहे, अतिरिक्त मात्रा, ऑक्सिटोसिन दिल्या जातात. ते सामान्य कुत्र्यांपेक्षा जास्त गतिने काम करतात. तसेच आपल्या मालकांप्रती जास्त प्रेम करतात. संशोधन कर्ते जसिका ओलिव्हा यांच्या मतानुसार, ऑक्सिटोसिनमुळे कुत्र्याचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो. तो माणसाच्या संकेतानुसार समजून काम करतो.
मेलबर्नमधील मोनाश विद्यापीठाच्या संशोधन कर्त्यांनी ७५ कुत्र्यांचा अभ्यास १२ महिने केला. या संशोधनात असे आढळून आले, ज्या कुत्र्यांना ऑक्सिटोसिन दिले गेले, ते सामान्य कुत्र्यांपेक्षा चांगले काम करण्यात माहीर दिसून आलेत. सर्व सस्तन प्राण्यांत पिट्युइटरीचे संप्रेरक उत्पन्न होते. यासंबधी त्यांचे ऑक्सिटोसिन संबंधित आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.