'इच्छा नसतांना दररोज ३० जण माझा उपभोग घेत होते'

दररोज मुलं आणि मुली हरवण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. आपल्या जिवाभावाची माणूस हरवणे, एक अल्पवयीन मुलगी हरवण्याचं दु:ख काय असतं? हे कोण सांगू शकेल. ज्या महिलेवर ही वेळ आली, ज्या महिलेला देह व्यापार करण्यास भाग पाडण्यात आलं, डांबुन ठेवण्यात आलं, तिची ही हृदयद्रावक कहाणी

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2015, 09:15 PM IST
'इच्छा नसतांना दररोज ३० जण माझा उपभोग घेत होते' title=

काठमांडू : दररोज मुलं आणि मुली हरवण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. आपल्या जिवाभावाची माणूस हरवणे, एक अल्पवयीन मुलगी हरवण्याचं दु:ख काय असतं? हे कोण सांगू शकेल. ज्या महिलेवर ही वेळ आली, ज्या महिलेला देह व्यापार करण्यास भाग पाडण्यात आलं, डांबुन ठेवण्यात आलं, तिची ही हृदयद्रावक कहाणी

सुनीता दानुवार यांनी अनंत यातना सोसल्या
मात्र सुनीता दानुवार दु:ख करत बसल्या नाहीत, त्या आता देहव्यापारासाठी होणाऱ्या मुलींच्या तस्करीविरोधात लढा देत आहेत. सुनीता दातार यांचं यापूर्वीचं आयुष्य काय होतं, हे ऐकलं तरी अंगावर काटा येतो, मानवी मन सुन्न होतं. मात्र आता सुनीता दानुवार असं काम करत आहेत, ज्यामुळे त्यांचं नाव सन्मानानं घेतलं जात आहे.

वेश्या व्यवसायास भाग पाडण्यात आलं
सुनीता दानुवार यांनी देह व्यापाराविरोधात मोहिमच उघडली आहे, या महिलेचं जगभरातून कौतुक होतंय. सुनीता हा १४ वर्षांच्या होत्या, तेव्हापासून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं.

दररोज ३० जण उपभोग घेत असत
सुनीता दानुवार यांना एका रूममध्ये कोंडून ठेवण्यात आलं, शिवाय त्यांना तिथे मारहाणही करण्यात येत होती. सर्वात भयानक आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे दररोज ३० जण सुनीता यांच्या शरीराचा उपभोग घेत होते.

सुनीता दानुवार यांचा संघर्ष आता इतर मुलींसाठी
मुंबईतील वेश्या व्यवसायात पाच महिने जबरदस्तीने डांबून ठेवलेल्या सुनीता दानुवार, हे आपली सुटका करून घेण्यास यशस्वी ठरल्या. स्वत:ची सुटका झाली, म्हणून त्या गप्प बसल्या नाहीत, त्यांच्या नशीबी जे आलं, ते इतरांच्या नशीबी येऊ नये, म्हणून त्यांनी मोहिम सुरू केली. 

बहुतांश मुली या अल्पवयीन
सुनीता यांचा लढा सुरू झाला. सुनीता यांनी अनेक मुलींची सुटका केली आहे, सुटका करणाऱ्या बहुतांश मुली या अल्पवयीन आहेत.

नेपाळच्या मुलींना सर्वाधिक फसवण्यात येतं 
नुकताच नेपाळमध्ये भूकंप झाला, मुलींच्या व्यापाराचे अनेक प्रयत्न झाले, नेपाळच्या मुलींसह त्यांच्या कुटुंबाला फसवण्यात आलं, त्यासाठी देह व्यापार करण्यास भाग पाडण्यात आलं, असं सुनीता सांगते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.