पिस्तुलसोबत सेल्फी काढणे पडले महाग, गेला जीव

आजकाल तरुण-तरुणींच्या हातात स्मार्टफोन दिसत आहेत. त्यामुळे सेल्फी काढण्याचे फॅड वाढलेय. मात्र, पिस्तुलसोबत सेल्फी काढणे जीवघेणे ठरले आहे.

Reuters | Updated: Sep 3, 2015, 08:01 PM IST
पिस्तुलसोबत सेल्फी काढणे पडले महाग, गेला जीव title=

वॉशिंग्टन : आजकाल तरुण-तरुणींच्या हातात स्मार्टफोन दिसत आहेत. त्यामुळे सेल्फी काढण्याचे फॅड वाढलेय. मात्र, पिस्तुलसोबत सेल्फी काढणे जीवघेणे ठरले आहे.

अमेरिकेतील टेक्‍सासमध्ये एका तरुणाने स्मार्टफोनवरून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नादात स्वत:वरच गोली चालवली गेली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. 

तरुणाने पिस्तुल घेऊन स्वत:च्या गळ्याला लावले. सेल्फी काढताना त्याने पिस्तुल धरले तेव्हा बंदुकीमध्ये गोळ्या आहेत, हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे सेल्फी घेताना गंमत म्हणून त्याने पिस्तुलचा चाप ओढला आणि गोळी गळ्यातून आरपार गेली.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.