दर्बन : मुलगी वयात आल्यानंतर धर्मोपदेशकच तिच्यावर बलात्कार करून तिचं शुद्धीकरण करतो... आणि यासाठी मुलींच्या आईचीही मूक मान्यता असते... धक्कादायक वाटतंय ना... पण, हे खरं आहे.
दक्षिण पूर्व आफ्रिकन देश असलेल्या मलावीच्या सुदूर भागात ही अजब प्रथा अजूनही पाहायला मिळतेय. सेक्स वर्करचं काम करणाऱ्या या धर्मोपदेशकाला इथं 'हायना' म्हटलं जातं... आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराला 'शुद्धीकरण' असं नाव दिलं गेलंय.
धक्कादायक म्हणजे, इथं काही एडस पीडित हायनाही कार्यरत आहेत. बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, वयात आलेल्या मुलीला शुद्ध करण्यासाठी तिला हायनासोबत संभोग करावा लागतो. यासाठी त्यांच्या आईचीही मान्यता असते... त्यांनीही हा अनुभव लहानपणी घेतलेला आहे. हायनाला मुलींसोबत सेक्स करताना कंडोम वापरण्याची परवानगी नाही. तसंच आपला आजारही या हायनांकडून जाहीर केला जात नाही.
यांसारख्या प्रथांमुळेच इथं एडससारखे गंभीर आजार पसरताना दिसत आहेत. मलावीमध्ये प्रत्येक दहापैंकी एक जण एचआयव्हीग्रस्त आहे.
इतकंच नाही तर जर एखाद्या पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याच्या शरीराचं दहन करण्यापूर्वी त्याच्या पत्नीला 'हायना'सोबत सेक्स करून स्वत:च शुद्धीकरण करून घ्यावं लागतं... जर एखाद्या महिलेचा गर्भपात झाला असेल तर तिलाही आपलं शुद्धिकरण करून घ्यावं लागतं.
जर महिलांचं असं शुद्धिकरण केलं गेलं नाही तर त्यांचे कुटुंबीय किंवा संपूर्ण गाव रोगराईला बळी पडेल, असं इथं मानलं जातं. एका हायनाचे १०० किंवा त्याहून अनेक महिलांशी संपर्क झालेला आढळून येतोय.
एका महिलेसोबत सेक्स करून तिला शुद्ध करण्यासाठी हायनाला एका वेळेस २०० ते ५०० रुपये मिळतात. चांगलं चरित्र असणाऱ्या लोकांनाच 'हायना' म्हणून नियुक्त केलं जातं... त्यामुळे त्यांना काही आजार असण्याची शक्यताच नसल्याचं इथल्या रहिवाशांचा समज आहे.
ही प्रथा पाळणाऱ्यांपैंकी प्रत्येकाला याचा अंदाजा आहे की चर्च, एनजीओ आणि सरकारही या प्रथेच्या विरुद्ध आहे. ही प्रथा मोडून काढण्यासाठी सरकारकडून एक मोहीमही या भागात सुरू आहे.