नवी दिल्ली : 10 मिलियन डॉलर बक्षीस असलेला दहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. लाहोर हायकोर्टाने त्याच्यावरील नजरकैद संपवण्याच्या मागणीची याचिका फेटाळली आहे.
हाफिजच्या वकिलांनी म्हटलं की, परदेशी शक्तींच्या दबावात सरकारने हाफिजला अनावश्यक आणि अवैध पद्धतीने बंधन बनवलं आहे. कोर्टाने मात्र हाफिजच्या वकिलांचं म्हणणं बाजुला करत हाफिजला नजरकैदेतून मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे सध्या तरी हाफिजच्या अडचणी काही कमी होतांना दिसत नाही आहे.