वॉशिंग्टन: सेल्फीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन अमेरिकेच्या एका विद्यापीठाने 'सेल्फी' आणि 'सेल्फ पोट्रेट'वर एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे.
'साउथर्न कॅलिफोर्निया' विद्यापीठामध्ये या वर्षी हा पाठ्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचं 'रायटिंग १५०: रायटिंग अॅंड क्रिटिकल रीझनिंग' असं नाव ठेवण्यात आलं आहे.
या विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक मार्क मॅरिनो यांनी सांगितले की, आमचे विद्यार्थी शिकतील की सध्या सेल्फी संवादाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण स्वत:ला कसं सादर करतो आणि आपण स्वत:ला कसं सादर केल्याने काय फरक पडतो.
अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पाच फोटो घ्यायचे आहेत आणि त्या फोटोतील वस्त्र, हाव-भाव तसेच फोटोत दिलेल्या इतर वस्तूचं विश्लेषण करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या सेल्फीचा दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि प्रसिद्ध व्यक्तीच्या सेल्फीची तुलनाही करावी लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.