चीन : धावपळीच्या आयुष्यात दररोज पुशअप्स करणं तर तरण्या-ताठ्या मुलांनाही जमत नाही... पण, हीच गोष्ट चीनमधील एक ८१ वर्षांच्या आजीबाई करून दाखवतात... तेही, केवळ पाच मिनिटांत १०० पुशअप्स करणाऱ्या या आजीबाई सध्या भलत्याच प्रसिद्ध झाल्यात.
'ली गुचआन' असं या आजीबाईंचं नाव... समाचार एजेन्सी सिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, फुझियान या भागातील रहिवासी असलेल्या ली गचुआन यांना खेळाची आवड आहे. त्यांनी आपल्या कौशल्यान बरीच ख्यातीही मिळवलीय. जुलै महिन्यात त्यांनी ८१वा जन्मदिवस साजरा केला आहे. या वयातदेखील त्या बास्केटबॉलचा अभ्यास आणि पुशअप्स दोन्ही गोष्टी करतात.
यासाठी त्यांनी एक नवीन व्यायाम प्रकारही केलाय... 'रॉली-पॉली रोल' हा त्यांनी निर्माण केलेल्या व्यायामाच्या प्रकाराचं नाव... हा व्यायाम केल्यानं स्नायू आणि हाडांना याचा चांगला फायदा होतो. याचमुळे, 'या वयातही मी खेळाचा आनंद घेऊ शकतेय... व्यायाम केल्यामुळे मला आनंद मिळतो’ असं ली यांनी म्हटलंय.
ली या ६८ वर्षांच्या असताना त्यांना ‘आपण खेळांत चांगलं करिअर करू शकतो’ असा विश्वास वाटला... ‘मला खरोखर आनंद वाटतो. आणि मला कोणताच त्रास होत नाही. मी स्वस्थ असून वेगाने चालू शकते. जोपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही. तोपर्यंत तुमचा विश्वास बसणार नाही' असंही त्या म्हणतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.