बीजिंग : चीनने पुन्हा एकदा गुगल विरोधात शड्डू ठोकला आहे. ई-मेलसाठी प्रसिद्ध असलेल्या गुगलच्या जीमेल सेवेला चीनने आजपासून लॉगआऊट केले आहे.
मोठ्या प्रमाणात 'जीमेल'चे खातेधारक असलेल्या चीनमधून ही सेवा आजपासून बंद झाली आहे, अशी माहिती ग्रेटफायर डॉट ओआरजीने दिली.
'जीमेल'ची सेवा बंद झाल्यामुळे अनेक खातेधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चीनने देशातील ई-मेल सेवेचा वापर करण्याची सूचना केली होती. त्यानंतरही लाखो नेटिझन्स 'जीमेल'चा वापर करत होते. अखेर देशातील 'जीमेल'सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे.
चीनने गेल्या जूनपासून जीमेलच्या आमॅप, एसएमटीपी, पॉप3 या सेवा बंद केल्या आहेत.
चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ छुनिंग म्हणाल्या, 'जीमेल'सेवा बंद झाल्याबद्दल माहिती नाही. परंतु, सरकारने देशात चांगल्या ई-मेल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. चांगल्या सेवा देणाऱ्या परदेशी कंपन्यांचे देशात स्वागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.