नऊ वर्षांच्या मुलीने केली आईची डिलेवरी

आपल्या आईला लेबर पेन होताहेत आणि तिच्या जवळ कोणी नाही, हे पाहून ९ वर्षीय अलिसा मेझा या धाडसी मुलीने स्वतः आपल्या आईच्या डिलेवरीत मदत केल्याची घटना शिकागोमध्ये घडली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 6, 2014, 07:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, शिकागो
आपल्या आईला लेबर पेन होताहेत आणि तिच्या जवळ कोणी नाही, हे पाहून ९ वर्षीय अलिसा मेझा या धाडसी मुलीने स्वतः आपल्या आईच्या डिलेवरीत मदत केल्याची घटना शिकागोमध्ये घडली.
आई घरात एकटी होती, तिला खूप वेदना होत होत्या. तिला मी धीर दिला आणि मला दिसले की बाळ बाहेर येत आहे. मी आईला सांगितले की, तू पूश कर आणि मी बेबीला कॅच करते. अलिसाने एका स्थानिक वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
माझी आई खूप घाबरली होती. तिला वेदना होत असताना मी माझ्या बहिणीला कॅच केले. तिला घट्ट पकडले आणि एका टॉवलमध्ये गुंडाळल्याचे अलिसाने सांगितले. अलिसाने मुलीच्या गळ्याभोवती अडकलेली तीची नाळ हळुवारपणे काढली. नाळ अशा पद्धतीने काढावी लागते हे मी एका मेडिकल टीव्ही शोमध्ये पाहिले होते, असे अलिसाने सांगितले.

मग मी शेजारी पळाले आणि शेजारच्यांना बोलावले. कारण माझी लहान बहीण जरा जांभळी पडली होती. शेजाऱ्यांनी ९११ ला फोन केला आणि त्यानंतर आई आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.