जर्मनीच्या म्युनिकमध्ये अंधाधूंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय

जर्मनीच्या म्युनिक शहरामधल्या एका शॉपिंग सेंटरमध्ये अंधाधूंद गोळीबार झाला आहे. 

Updated: Jul 22, 2016, 11:06 PM IST
जर्मनीच्या म्युनिकमध्ये अंधाधूंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय title=

म्युनिक : जर्मनीच्या म्युनिक शहरामधल्या एका शॉपिंग सेंटरमध्ये अंधाधूंद गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

हा गोळीबार कोणी केला आणि यामागे काय कारण आहे, याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. या गोळीबारामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी म्युनिकच्या स्थानिक वृत्तपत्रानं दिली आहे, तर 10 जणांना जीव गमवावा लागल्याचं जर्मनीमधलं न्यूज चॅनल एनटीव्हीनं दावा केला आहे.