फ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळलं, १४८ जणांच्या मृत्यूची शक्यता

स्पेनहून जर्मनीला जाणारं एअर बस ए ३२० हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळलं असून विमानात १४२ प्रवासी आणि ६ कर्मचारी असं एकूण १४८ जण होते. अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता फ्रान्सच्या पंतप्रधानांनी वर्तवली आहे. 

Updated: Mar 24, 2015, 07:27 PM IST
फ्रान्समध्ये एअर बस विमान कोसळलं, १४८ जणांच्या मृत्यूची शक्यता title=

पॅरिस: स्पेनहून जर्मनीला जाणारं एअर बस ए ३२० हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळलं असून विमानात १४२ प्रवासी आणि ६ कर्मचारी असं एकूण १४८ जण होते. अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता फ्रान्सच्या पंतप्रधानांनी वर्तवली आहे. 

स्पेनमधील बार्सिलोना इथल्या १४२ प्रवाशांना घेऊन एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील डूसलडॉर्फच्या दिशेनं निघालं होतं. विमानात एकूण सहा कर्मचारी होते. फ्रान्सच्या हवाई क्षेत्रातून जात असताना आल्स पर्वताजवळ विमानाचा रडार यंत्रणेची संपर्क तुटला. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास वैमानिकांशी संपर्क झाला होता. यानंतर काही वेळानं विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता. हे विमान आल्स पर्वत रांगाच्या परिसरात कोसळलं असून विमानाचे अवशेष आढळल्याची माहिती फ्रान्स सरकारनं दिली आहे. 

विमान ज्या भागात कोसळलं तो भाग दुर्गम असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विमानातील १४८ प्रवासी जीवंत असण्याची शक्यता फार कमी आहे, अशी माहिती फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्यूअल वॉल्स यांनी दिलीय. अपघाताचं नेमकं कार अद्याप समजू शकलेलं नाही.

एअर बस ए ३२० हे विमान जर्मनीतील जर्मन विंग्स या कंपनीचं होतं. जर्मन विंग्स ही जर्मनीतील सर्वात स्वस्त सेवा देणारी एअरलाइन्स कंपनी आहे. अपघातातील जीवितहानी विषयी कंपनीनं अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही या अपघाताची माहिती घेत आहोत, असं ट्विट कंपनीच्यावतीनं करण्यात आलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.