काओसिउंग, तैवान: तैवानमध्ये गॅसपाईपलाईनमध्ये अनेक स्फोट झालेत. या स्फोटात २४ जण ठार तर २७० जण जखमी झालेत. गॅसगळती झाल्यामुळं हे स्फोट झाल्याचं सांगण्यात येतयं. या स्फोटाची तीव्रता एखाद्या भुकंपाएवढी भीषण होती. त्यात अनेक रस्ते खचले आणि गाडयांची मोडतोड झाली. रस्तांवर असलेले लोक या स्फोटाचे बळी ठरले.
काओसिउंग शहरात अनेक ठिकाणी गॅस पाइप, वीज वाहून नेणाऱ्या तारांचे जाळे आणि सांडपाणी वाहून नेणारे गटार हे सगळे एकमेकांना खेटून आहे. त्यामुळं दुर्घटना झाल्यामुळं रस्त्यावर एकदम वेगानं आग पसरली. अनेक गाड्यांनी पेट घेतला आणि लागोपाठ स्फोट झाल्यामुळं भूकंपाचा धक्का बसल्यासारखा मोठा हादरा बसला. रस्त्याला मोठे खड्डे पडले.
या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. एखादं वादळ यावं तशा वेगानं आग पसरली आणि लागोपाठ मोठे स्फोट झाले, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.