नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जॉन केरी यांनी काल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत द्वीपक्षीय चर्चा केली. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही देशांमधला हा पहिलाच वार्तालाप आहे.
अमेरिकन गुप्तचरांनी भारतीय नेते आणि विशेषतः भाजपच्या नेत्यांवर केलेल्या हेरगिरीचा मुद्दा यावेळी चर्चिला गेला. आपल्या मित्रराष्ट्रांची हेरगिरी करणं योग्य नसल्याचं स्वराज यांनी केरी यांना खडसावून सांगितलं.
केरी यांनी मात्र यावर सारवासारवच केली. गुप्तचर संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारे ओबामा हे पहिले अध्यक्ष असल्याचं केरी म्हणाले. या खेरीज व्यापार, भारतानं व्यापार संघटनेच्या कराराला केलेला विरोध, दहशतवाद अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.