मर्समुळे दक्षिण कोरियामध्ये ७०० शाळा बंद

मर्स (मिडल ईस्ट रेस्पीरेटरी सिंड्रोम) विषाणूने आतापर्यंत 35 लोक बाधित झाल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियामधील शेकडो शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मर्समुळे 2 लोकांचा बळी गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रवासाचे बेत रद्द केले आहेत. लोकांमध्ये पसरलेली घबराट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागत आहेत.

Updated: Jun 5, 2015, 05:47 PM IST
मर्समुळे दक्षिण कोरियामध्ये ७०० शाळा बंद title=

सेऊल : मर्स (मिडल ईस्ट रेस्पीरेटरी सिंड्रोम) विषाणूने आतापर्यंत 35 लोक बाधित झाल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियामधील शेकडो शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मर्समुळे 2 लोकांचा बळी गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रवासाचे बेत रद्द केले आहेत. लोकांमध्ये पसरलेली घबराट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागत आहेत.

मर्समुळे  लोकांमध्ये पसरलेली घबराट पाहत 700 शैक्षणिक संस्था बंद केल्या असून यात लहान मुलांच्या शाळांसोबतच अनेक महाविद्यालयांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने आणखी 5 प्रकरणांचा खुलासा केला असून मर्सने बाधित लोकांची संख्या 35 झाली आहे.

मर्सचे पहिले प्रकरण 20 मे रोजी उजेडात आले होते, ज्यात एक 68 वर्षीय व्यक्ती सौदी अरेबियाच्या प्रवासादरम्यान बाधित सापडला होता. या घटनेनंतर या विषाणूच्या संपर्कात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या आलेल्या 1300 लोकांना वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. याशिवाय सर्वत्र लोक तोंडावर मास्क लावून फिरताना दिसत आहेत.

कोरिया पर्यटन संस्था (केटीओ)ने आतापर्यंत 7000 पर्यटकांनी आपल्या सामुहिक सहली रद्द केल्याची माहिती दिली. यात चीन आणि तैवानमधील संख्या सर्वाधिक आहे. जागतिक पातळीवर आतापर्यंत 1161 लोकांना मर्सची लागण झाली असून 436 लोकांचा बळी या विषाणूने घेतला आहे. 20 हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव दिसून आला असून सौदी अरेबियामध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे.

या विषाणूवर अद्याप कोणताही उपचार किंवा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. हा विषाणू सार्सपेक्षा कमी परंतु घातक मानला जात आहे. 2003 मध्ये आशियामध्ये शेकडो लोक सार्सचे बळी ठरले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.