कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फ्रान्समध्ये केला नवा कायदा

फ्रान्समध्ये एक नवा कायदा पारित झाला आहे. यामुळे कार्यालयीन आणि खासगी जीवन वेगवेगळं राखण्यास मदत होणार आहे. स्मार्ट फोनचा वापर आता वाढल्यानं घरी असतानाही ऑफिसचे ईमेल बघावे लागतात. त्यामुळं घराचंही कार्यालय झाल्याचा कित्येकांना भास होतो आणि याचा त्रासही होतो तसच याचा खासगी जीवनावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच फ्रान्समध्ये हा कायदा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आला आहे.

Updated: Jan 1, 2017, 10:13 PM IST
कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फ्रान्समध्ये केला नवा कायदा title=

पॅरिस : फ्रान्समध्ये एक नवा कायदा पारित झाला आहे. यामुळे कार्यालयीन आणि खासगी जीवन वेगवेगळं राखण्यास मदत होणार आहे. स्मार्ट फोनचा वापर आता वाढल्यानं घरी असतानाही ऑफिसचे ईमेल बघावे लागतात. त्यामुळं घराचंही कार्यालय झाल्याचा कित्येकांना भास होतो आणि याचा त्रासही होतो तसच याचा खासगी जीवनावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच फ्रान्समध्ये हा कायदा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आला आहे.

५० हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांना हा कायदा लागू करण्यात आला आहे. खरतर आज फ्रान्सच नाही तर इतर देशांमध्येही हा कायदा लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. कंपन्यांनी हा कायदा कठोरपणे अंमलात आणण्याची गरज असल्याचं फ्रान्समधले तज्ज्ञ झेविय झुनिगो यांनी म्हटलंय. फोक्सवॅगन आणि डॅमलर या जर्मनीच्या कंपन्यांनी आधीच हा कायदा लागू केला आहे. दुसरीकडे फ्रान्समध्य 35 तासांचा आठवडा करण्याची मागणी होतेय. त्यामुळं ही मागणी करणा-या कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.