दुपारी ३.४४ वाजता
पॅरीसच्या दक्षिण भागातल्या लिओ या उपनगरात गोळीबारापाठोपाठ एका रेस्टॉरंटमध्ये स्फोट
स्थानिक वेळेनुसार पहाटे सहा वाजता मशिदीजवळ स्फोट
दोन दिवसांत पॅरीसमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाल्यामुळं जगभरात चिंतेचं वातावरण आहे.
दुपारी २.२२ वाजता
दक्षिण पॅरिसमध्ये पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात दोन पोलिसांसह तीन नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याचं कळतंय.
पॅरिस: फ्रान्समधील चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना अद्याप ताजी असतानाच दक्षिण पॅरिसमध्ये आज पुन्हा एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी आणि ३ नागरिक जखमी झाले आहेत. मात्र कालच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या आजच्या हल्ल्याशी संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
कालच्या हल्लेखोरांपैकी एक १८ वर्षीय हल्लेखोर पोलिसांना शरण आला असला तरीही इतर दोन हल्लेखोर अद्याप फरार असल्यानं त्यांनीही हा हल्ला केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी तीन सशस्त्र हल्लेखोरांनी पॅरिसच्या व्यंगात्मक आणि तिरकस लेखनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डाव्या विचारांच्या साप्ताहिकाच्या हल्ला केला होता. त्यात संपादक, चार व्यंगचित्रकारांसह १२ जण ठार झाले असून सात जण जखमी झाले होते.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पॅरिस शहरात तसंच संपूर्ण फ्रान्समध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतानाही हा हल्ला झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हल्ल्यानंतर २० देशांमधील फ्रान्सची दूतावास आणि सांस्कृतिक केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.