पॅरिस हल्ला: चार्ली हेब्दोवर हल्ला करणाऱ्या संशयिताचं समर्पण

चार्ली हेब्दो मॅगझिनच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या एका संशयितानं आत्मसमर्पण केलंय. १८ वर्षाच्या मुरादनं पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. 

Reuters | Updated: Jan 8, 2015, 12:49 PM IST
पॅरिस हल्ला: चार्ली हेब्दोवर हल्ला करणाऱ्या संशयिताचं समर्पण title=

पॅरिस: चार्ली हेब्दो मॅगझिनच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या एका संशयितानं आत्मसमर्पण केलंय. १८ वर्षाच्या मुरादनं पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. 

हल्ल्यातील तीन संशयितांची ओळख केली गेली होती. तीन संशयितांपैकी एकानं सोशल मीडियावर आपल्या नावाची चर्चा झाल्यानंतर आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्याला अटक केलीय. दहशतवाद्यांच्या शोधासाठी पॅरिस आणि त्याच्याजवळपासच्या परिसरात कसून तपास सुरू आहे. 

न्यूज एजेंसी असोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार फ्रान्स पोलिसांनी बुधवारी मॅगझिन चार्ली हेब्दोच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या तीन संशयीतांची ओळख पटवलेली आहे. पोलिसांना दोन सख्खे भाऊ आणि एक १८ वर्षांच्या तरुणावर हल्ला केल्याचा संशय आहे. 

फ्रान्स पोलिसांच्या मते चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या दोन संशयितांचं नाव सय्यद क्वाची आणि शेरीफ क्वाची आहे. हे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि फ्रान्सचेच राहणारे आहेत. पोलिसांच्या मते तिसरा हल्लेखोर १८ वर्षांचा हैमद मोराद आहे. मात्र मोराद कुठला राहणारा आहे, हे अजून स्पष्ट झालं नाही. 

सांगण्यात येतंय की, चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला करणारा संशयित शेरीफ क्वाची २००८मध्येही दहशतवादी आरोपांमध्ये १८ महिन्यांची शिक्षा भोगलेला आहे. 

असोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार शेरीफ क्वाचीनं २००८मध्ये केसच्या सुनावणीदरम्यान म्हटलं होतं की तो अबु गरेब जेलमध्ये इराकी कैद्यांवरील अमेरिकेच्या सैनिकांनी केलेल्या अत्याचारामुळे अमेरिका आणि त्याच्या सोबतीच्या देशांविरोधात लढा लढणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.