फुटबॉल मैदानाच्या आकाराचं विमान आकाशात झेप घेणार

ब्रिटीश कंपनी हाइब्रिड एअर व्हीकल (एचएवी) चा जगातील सर्वात मोठं निमान एयरलँडर-१० हे पुढच्या महिन्यात आकाशात झेपावणार आहे. एका फुटबॉल  मैदानच्या आकाराचं हे विमान दोन आठवडे हवेत राहु शकतं. 

Updated: Feb 16, 2016, 11:41 AM IST
फुटबॉल मैदानाच्या आकाराचं विमान आकाशात झेप घेणार title=

मुंबई : ब्रिटीश कंपनी हाइब्रिड एअर व्हीकल (एचएवी) चा जगातील सर्वात मोठं निमान एयरलँडर-१० हे पुढच्या महिन्यात आकाशात झेपावणार आहे. एका फुटबॉल  मैदानच्या आकाराचं हे विमान दोन आठवडे हवेत राहु शकतं. 

जगातील सर्वात मोठ्या या विमानाची लांबी 72.7 मीटर तर रुंदी 79.8 मीटर आणि ऊंची 24.1 मीटर आहे. एयरलँडरचा आकार हा त्यात असणाऱ्या हिलिअममुळे मोठा आहे. या विमानात एकूण २८ प्रवाशी आणि पायलट प्रवास करू शकतात.

विमान परिक्षणावेळी हे विमान फक्त १७.२५ मैल पर्यंतच उडवलं जाणार आहे. हे परिक्षण यशस्वी झालं तर हे विमान म्हणून त्याची भूमिका पार पाडू शकेल. हे विमान अतिशय कमी ध्वनी आणि वायू प्रदुषण करतं. या विमानाला लँडीग आणि टेकऑफसाठी धावपट्टीची गरज नाही.