व्हिडिओ: बुडालेल्या पिल्लाला वाचविण्याचा हत्तीणीचा संघर्ष

माणसाप्रमाणे प्राण्यांचाही आपल्या मुलांवर खूप जीव असतो... किंबहूना जास्त म्हटलं तर वावगं ठरणार नाही... आई आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी काहीही करू शकते. याचाच प्रत्यय एका हत्तीणीलाही आला. 

Updated: Oct 28, 2015, 01:06 PM IST
व्हिडिओ: बुडालेल्या पिल्लाला वाचविण्याचा हत्तीणीचा संघर्ष title=

मुंबई: माणसाप्रमाणे प्राण्यांचाही आपल्या मुलांवर खूप जीव असतो... किंबहूना जास्त म्हटलं तर वावगं ठरणार नाही... आई आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी काहीही करू शकते. याचाच प्रत्यय एका हत्तीणीलाही आला. 

आणखी वाचा - व्हिडीओ | सहा हत्तींचा मोटरसायकलस्वारावर हल्ला

आपलं पिल्लू तलावात बुडलेलं पाहून हत्तीणीनं इतर हत्तीणींच्या सहाय्यानं पिल्लाला सुखरूप बाहेर काढलं. चोपडे पणामुळं हत्तीचं पिल्लू तलावात घसरून पडलं होतं. पहिले हत्तीणीनं एकटीनं पिल्लाला बाहेर काढण्याचा संघर्ष केला. पण जमीन खूप चोपडी असल्यानं तिला ते जमत नव्हतं.. मग इतर हत्तींची मदत घेत तिनं पिल्लाला बाहेर काढलं. या व्हिडिओतून एकीचं बळ पुन्हा सिद्ध होतं... माणसांमध्ये नाही पण प्राण्यांमध्ये मदतीची इच्छा अजून टिकून आहे, हे सुद्धा दिसून येतं. 

पाहा या संघर्षाचा संपूर्ण व्हिडिओ - 

 

आणखी वाचा - हत्तीच्या पिलाने पूर्ण केली बाथटफची हौस

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.