क्वीटो : इक्वेडोरमध्ये रविवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का इतका मोठा होता की इक्वेडोरची राजधानी क्वीटोमधील अनेक इमारतींना भेगा पडल्या.
या भूकंपामध्ये २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्सुनामीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
अमेरिकन भूवैज्ञानिकांनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू म्युस्ने शहरात होता. स्थानिक वृत्तानुसार काही भागांमध्ये घराची छते कोसळली आहेत तर एक फ्लायओव्हरही कोसळल्याची माहिती आहे.