Viral Video: दारुड्याने लिफ्टचा दरवाजा तोडून पडला खड्ड्यात

  चीनमधील हँगझू शहरात एक विचित्र घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

Updated: Feb 10, 2016, 02:14 PM IST

हँगझू :  चीनमधील हँगझू शहरात एक विचित्र घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. एक २४ वर्षीय दारुडा युवक एका पार्टीनंतर धिंगाणा करायला लागला.  त्याने लिफ्टच्या दरवाजाला लाथ मारून दरवाजा तोडला आणि आतील खड्ड्यात कोसळला. 

येथील केटीव्ही लाउंज येथे आपल्या मित्रासोबत झालेल्या वादानंतर यांग याने बंद असलेल्या लिफ्टच्या दरवाजाला लाथ मारली. एका किकने तो चायना माल असलेला लिफ्टचा दरवाजा तुटला. त्याला दारूच्या नशेत काही सुचले नाही आणि त्या तुटलेल्या दरवाजातून तो खाली जाण्याचा प्रयत्न केला, पण लिफ्ट आली नसल्याने तो सरळ लिफ्टच्या खड्ड्यात पडला. 

चौथा मजल्यावरून खाली पडला. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले. सुदैवाने तो वाचला आणि त्याचा फक्त पाय फ्रॅक्चर झाला.