सावधान, ही भिंत तुमच्या अंगावर 'शू' करते!

 तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात राहतात, तुम्हांला कोठेही शू करणारे व्यक्ती दिसतात.  भारतात हे प्रमाण मोठे आहे. पण परदेशात असे 'शू' बहाद्दर आपल्याला पाहायला मिळतात. जर्मनीमधील हॅम्बुर्ग येथे अशाच 'शू' बहाद्दराना अद्दल घडविण्यासाठी एक नवीन शक्कल लढविण्यात आली आहे. 

Updated: Mar 9, 2015, 08:55 PM IST
सावधान, ही भिंत तुमच्या अंगावर 'शू' करते! title=

हॅम्बुर्ग :  भारतात सध्या स्वच्छ भारत अभियान मोठ्या उत्स्फुर्ततेने राबविले जात असताना रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला बिनधास्त 'शू' करणाऱ्या बहाद्दरावर आळा घालण्याचा उपाय अजून तरी भारतात निघाला नाही. पण यावर एक उपाय शोधून काढला आहे जर्मनीमध्ये... 

तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात राहतात, तुम्हांला कोठेही शू करणारे व्यक्ती दिसतात.  भारतात हे प्रमाण मोठे आहे. पण परदेशात असे 'शू' बहाद्दर आपल्याला पाहायला मिळतात. जर्मनीमधील हॅम्बुर्ग येथे अशाच 'शू' बहाद्दराना अद्दल घडविण्यासाठी एक नवीन शक्कल लढविण्यात आली आहे. 

शहरात ठिकठिकाणी शू करू ठेवल्याने परिसरात दुर्गंधी पसरते आणि शहर घाण होते. त्यामुळे अनेकांना त्रास होतो. हॅम्बुर्ग येथील सेंट पाऊली येथील काही अवलियांनी एक सोल्यूशन शोधून काढले. ते सोल्यूशन भिंतीवर लावले आणि त्या भिंतीवर जर कोणी 'शू' केली तर ती 'शू' परत त्यांच्या अंगावर फेकली जाते. 

यासाठी त्यांनी शहराच्या काही भागातील भिंतीवर हा स्प्रे मारला. ही हायड्रोफोबिक कोटिंगमुळे ती भिंत अल्ट्रा ड्राय होते. त्यामुळे त्या भिंतीवर कोणत्याही प्रकारचा द्रव पदार्थ टिकत नाही. अळवाच्या पानावर जसे पाणी टिकत नाही. तसेच या कोटिंगवर केलेली 'शू' टीकत नाही. 

अशा प्रकारचे कोटिंग लावल्यानंतर त्यांनी सावधानतेचा इशारा या भिंतीवर लावला. पण काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि 'शू' करण्याचा प्रयत्न केला. मग काय झाले हे तुम्हीच या व्हिडिओ मध्ये पाहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.