सिडनी : जागतिक महिला दिनी ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये भारतीय इंजीनियर प्रभा अरुण कुमार यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.
बंगळुरुमध्ये पती आणि मुलीसह राहणा-या प्रभा 2012 पासून सिडनीच्या माइंड ट्री नावाच्या कंपनीत काम करत होत्या.. सिडनीत त्या एकट्याच राहत होत्या.
ऑफिसमधून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.. यावेळी जे हवं ते घे मात्र मला मारु नको, अशी विनवणी प्रभा यांनी हल्लेखोराकडे केली.
मात्र ते ऐकून न घेता हल्लेखोरानं प्रभा यांची चाकू भोसकून हत्या केली.. तीन वर्षानंतर एप्रिल महिन्यात प्रभा भारतात आपल्या घरी येणार होत्या.. मात्र त्याआधी त्यांच्या हत्येची बातमी येऊन धडकलीय.
दरम्यान पोलीस प्रभा यांच्या मारेक-याचा शोध घेतायत.. आजूबाजूच्या इमारतीवर लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजचाही तपासात आधार घेतला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.