वॉशिंग्टन : परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोक-या घेऊ देणार नाही असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. ट्रम्प यांचं हे विधान अमेरिकेत एच-वन बी व्हिसावर काम करणा-या भारतीयांसाठी धोक्याची घंटा आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकन कामगारांसोबत वेळ घालवला आहे. अमेरिकन कर्मचा-यांची जागा परदेशी नागरिक घेतात, यापुढे हे होऊ देणार नसल्याचं ट्रम्प म्हणालेत.
डिझनी वर्ल्ड आणि अन्य अमेरिकन कंपन्या एच - 1 बी व्हिसाच्या आधारे परदेशातून कर्मचारी आणतात असे ट्रम्प म्हणाले. मेक्सिकोची सीमा अमेरिकेला लागून आहे तिथून मोठया प्रमाणावर घुसखोरी होते. ही घुसखोरी रोखण्यासाठी भिंत उभारणार असल्याचे ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी जाहीर केले होते.