वैद्यकीय चमत्कार; 'थ्री डी प्रिंट' नाकानं त्याला दिली जगण्याची नवी उमेद!

अमेरिकेत एक अनोख्या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आलीय. १४ वर्षींच्या एका मुलाला 'थ्री-डी प्रिंटेड' नाक ट्रान्सप्लान्ट करण्यात आलंय. 

Updated: Jan 2, 2016, 12:06 PM IST
वैद्यकीय चमत्कार; 'थ्री डी प्रिंट' नाकानं त्याला दिली जगण्याची नवी उमेद! title=

न्यूयॉर्क : अमेरिकेत एक अनोख्या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आलीय. १४ वर्षींच्या एका मुलाला 'थ्री-डी प्रिंटेड' नाक ट्रान्सप्लान्ट करण्यात आलंय. 

गुरुवारी डॉक्टरांनी नव्या नाकाचं यशस्वी टान्सप्लान्ट केलंय. थ्रीडी प्रिंटेड नाक मिळवणारा  'डलन जेनेट' हा १४ वर्षीय मुलगा पहिला रुग्ण ठरलाय. 

मार्शल आयलँडवर राहणारा जेनेट अवघ्या ९ वर्षांचा असताना वीजेची तार पडल्यामुळे त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी ट्रान्सप्लान्ट करण्यापूर्वी त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही केली होती. त्यामुळे, जेनेटला श्वास घेण्याची, वास घेण्याची क्षमता परत मिळाली होती.

'थ्रीडी' नाक बनवण्यासाठी डॉक्टरांनी जेनेटच्या कुटुंबीयांच्या नाकाचा अभ्यासही केला होता. त्यानंतर योग्य थ्रीडी नाक बनवण्यात त्यांना यश आलं. 

व्हिडिओ पाहा :-