लंडन : सेल्फी घेण्याच्या नादात आणखीन एक बळी गेलाय. ही घटना लंडनच्या ट्रियाना ब्रिजवर घडलीय.
२३ वर्षांची साइलविया राजकेल ट्रियाना ब्रिजवर सेल्फी काढण्याच्या नादात होती. यावेळी, नकळतच तिचा पाय घसरला आणि अचनक ती खाली कोसळली.
या घटनेत साइलवियाचा मृत्यू झालाय. अचानक घडलेल्या या घटनेवर विश्वास ठेवणंही तिच्या आईला कठिण जातंय.
१९ व्या शतकात बनलेला ट्रियाना ब्रिज हा पर्यटकांमध्ये भलताच प्रसिद्ध आहे.