नवी दिल्ली : दाऊदचा चेला खलीक अहमदने दाऊदचे ४० कोटी घेऊन फरार झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खलीक याला ४५ कोटी रुपये एका व्यक्तीकडून घ्यायचे होते. यामधले ४० कोटी कोणाला तरी पाठवायचे होते. ५ कोटी रुपये त्याला या कामासाठी बक्षीसाच्या रुपात मिळणार होते. पण खलीक ४० कोटी घेऊनही फरार झाला.
भारताच्या सुरक्षा यंत्रणांना याची माहिती मिळाली आहे की, ४० कोटी रुपयाचा खुलासा जाबिर मोती आणि खलीक अहमद यांच्यातील फोन संभाषणामुळे झाला. मोती पाकिस्तानातील दाऊदचा खास माणूस माणला जातो. याबाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली आहे पण ती गुप्त असल्याने एक माध्यम म्हणून आम्ही येथे सांगत नाहीत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने जगभरात काळा धंदा पसरवला आहे. अवैध हत्यारांनी तस्करी, आंम्ली पदार्थांची तस्करी, धमक्या देऊन पैसा उकळणे यासारख्या काळ्या धंद्यामध्ये त्याचा हात आहे. पण आता त्याचीच माणसं त्याला धोका देऊ लागल्याने त्याचा दबदबा कायम राहिला आहे की नाही हाच प्रश्न उपस्थित होतोय.