मॅक्सिको : एका हॉटेलच्या हॉट टबमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित करताना एका पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. हे जोडपे आपल्या मुलीच्या लग्नासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला.
मॅक्सिकोच्या हॉटेलमध्ये ६७ वर्षीय चार्ल्स मॅकेन्झी आपल्या ६३ वर्षीय पत्नी डॉरथी सोबत राहायला होते. या ठिकाणी त्यांचा मुलीचा विवाह होणार होता. रात्री हॉटेलच्या हॉट टबमध्ये ते शारिरीक संबंध बनवित होते.
त्यावेळी चार्ल्सचा हार्टअॅटकने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांनी दरवाजा उघडला नाही तेव्हा हॉटेल स्टाफने दरवाजा तोडला. तेव्हा दोघे विचित्र अवस्थेत पडलेले सापडले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.