अल-कायदाची भारतीय उपखंडात नवी शाखा, व्हिडिओ जारी

अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी याचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. इस्लामी दहशतवादी संघटना भारतीय उपमहाद्वीपमध्ये नवीन शाखा सुरु केली आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.

Updated: Sep 4, 2014, 09:44 AM IST
अल-कायदाची भारतीय उपखंडात नवी शाखा, व्हिडिओ जारी title=

वॉशिंग्टन : अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी याचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. इस्लामी दहशतवादी संघटना भारतीय उपमहाद्वीपमध्ये नवीन शाखा सुरु केली आहे, असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.

एसआयईटीई या दहशतवादी निगरानी समूहच्या जिहादी फोरमने हा व्हिडिओ जारी केलाय. यामध्ये संदेश देताना म्हटले आहे, आमची सुरक्षा कृत्रिम सीमा नष्ट करील. ज्या ठिकाणी मुस्लीम आहेत. तेथे आमचा फोरम काम करेल.

अल-कायदा पाकिस्तान आणि अफगानिस्तानमध्ये सक्रिय आहे. या संघनटनेचा नेता लपला आहे. मात्र, आमची संघटना भारत, म्यानमान, बांग्लादेश या देशांपर्यंत काम करणार आहे. त्यासाठी हा फोरम स्थापन केल्याचे जवाहिरी याने म्हटले आहे.

ही शाखा स्थापन करण्यासाठी दोन वर्षांपासून संघटना काम करीत आहे. आमचा प्रयत्न आहे की, भारतीय उपमहाद्वीपमध्ये मुजाहिद्दीन या संघटनेचे कार्य देशांतर्गत सुरु राहील, असे जवाहिरीने म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.