सोशल मीडियावर कमेंट केली आणि महिलेला १४ महिने जेल

आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय लागलीये. नुसते शेअरच नाही करत तर दुसऱ्यांच्या पोस्टला लाईक किंवा कमेंट ही करतो. हेच कमेंट करणे एका तुर्की महिलेला महाग पडलीये.

Updated: Jun 4, 2016, 05:48 PM IST
 सोशल मीडियावर कमेंट केली आणि महिलेला १४ महिने जेल title=

मुंबई : आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय लागलीये. नुसते शेअरच नाही करत तर दुसऱ्यांच्या पोस्टला लाईक किंवा कमेंट ही करतो. हेच कमेंट करणे एका तुर्की महिलेला महाग पडलीये.

या तुर्की महिलेने चक्क राष्ट्रपतींवर कंमेंट केलीये. ज्यानंतर तुर्कीच्या कोर्टाने तिला १४ महिन्यांची जेलमध्ये शिक्षा ठोठावलीये. मीडिया रिपोर्टनुसार या महिलेने २००६ मध्ये इंन्स्टाग्रामवर तुर्की राष्ट्रपती रचेप तय्यप अर्दोआनबद्दल अपमानकारक काही गोष्टी लिहिल्या. तिने राष्ट्रपतिंविरोधात एक थट्टा उडवणारी कविता लिहिलेली.

ही कविता महिलेने जेव्हा एर्दोआन तुर्कीचे प्रधानमंत्री होते तेव्हा पोस्ट केलेली. या गोष्टीच्या सुनवाईच्या वेळी एर्दोआन यांनी सांगितले की अशा पोस्ट या केवळ एका राष्ट्रपतिंच्या नाही तर कोणाही व्यक्तीच्या खाजगी अधिकारांवर केलेला हल्ला आहे.
या केस संदर्भात महिलेला २०१४ साली जेलमध्ये पाठविण्यात आले होते.