आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर

Updated: Sep 5, 2015, 11:18 PM IST
आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर title=

डॉक्टरांनी दिलं नवं जीवन 

टेक्सास : टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये वास्तव्यास असलेल्या 87 वर्षांच्या फ्रँक रेयसला डॉक्टरांनी नवं जीवन दिलय. साई-फाई सर्जरी करत डॉक्टरांनी मृत पावलेल्या त्यांच्या हातांना पोटाशी जोडले आहेत. ट्रकचा टायर बदलताना रेयस यांचा हाथ गरम असलेल्या जॅकला चिटकला होता. डॉक्टरांनी तीन आठवड्यांमध्ये रेयस यांचे हाथ त्यांच्या पोटातील पेशींशी जोडले आहेत. 

हल्यात 8 पोलिसांचा मृत्यू 
ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये अमेरिकी दूतावासनजिक हल्ल्यामध्ये 8 पोलिसांचा मृत्यू झालाय. ताजिक सुरक्षाबळांच्या कारवाईत 2 हल्लेखोर मारण्यात आले असून 6 नागरिकांना ताब्यात घेण्यात आलय. हल्ल्यानंतर अमेरिकी दूतावास बंद करण्यात आलं आहे. 

अमेरिका-युक्रेनच्या नौदला संयुक्त अभ्यास 
रशियासमवेत असलेल्या तणावाच्या संबंधाच्या परिस्थितीतही अमेरिका आणि युक्रेनच्या नौदलानं काला समुद्रामध्ये संयुक्तरित्या अभ्यास केला. 12 सप्टेंबरपर्यंत सुरु असलेल्या या नौदलाच्या ड्रिलमध्ये 18 लढाऊ जहाज, 14 विमानं आणि हॅलिकॉप्टर्सचा समावेश आहे.  

नासाचा बोइंगसमवेत करार 
अमेरिकेची स्पेस ऐजंसी नासानं बोइंगसमवेत करार केलाय. याअंतर्गत बोइंग, कमर्शियल स्पेस टॅक्सिजला प्रोसेसिंग सुविधा देण्यात येणार आहे. यापूर्वी नासानं अमेरिका अंतरिक्ष प्रवाशांना आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनपर्यंत नेण्यासाठी रशियाच्या अंतरिक्ष एजन्सीसमवेत असलेल्या करारत वाढ केलीय. हा करार 49 कोटी डॉलरचा आहे. 

शरणार्थींना ब्रिटनमध्ये प्रवेश
युरोपमध्ये येत असलेल्या शरणार्थींची परिस्थिती पाहता ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरुन यांनी हजारो शरणार्थींना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिलीय. याशिवाय कॅमरुननं शरणार्थींसाठी शंभर मिलियन पौंडांची मदत घोषित केलीय. 

हॅलिकॉप्टरचा अपघात 
अमेरिकामत नॉर्थ कॅरोलिनामध्ये सैन्याच्या एका ट्रेनिंग हॅलिकॉप्टरचा अपघात झालाय. या अपघातात एका मरीन कमांडोचा मृत्यू झालाय तर 11 कमांडो जखमी झालेत. 

नौका उलटून १५ जणांना जलसमाधी
मलेशियामध्ये समुद्रकिनारी एक नाव उलटण्यानं 15 नागरिकांचा मृत्यू झालाय. ज्या नावेचा अपघात झालाय ती नाव इंडोनेशियामध्ये रजिस्टर्ड आहे. 

रशियाचे यान अंतराळात
रशियाचं सोयूज रॉकेट 3 अंतरिक्ष यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहचलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहचणार रशियाचं अंतरिक्षम यान सग्रेई वॉल्कोवशिवाय, कजाकिस्तानचं एडियन ऐमबेतोव आणि डेन्मार्कचं अंतरिक्ष यान आंद्रेस मोगेनसन या यानांचा सहभाग आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.