नवी दिल्ली : स्पेनच्या उत्तर-पूर्व भागात कॅटेलूनियामध्ये ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही अप्रत्यक्षरित्या या सोहळ्यात सामील झालेत.
या भागातील ख्रिसमसच्या सेलिब्रेशनला महत्त्व आहे ते इथल्या लहान जीससची मूर्तींसाठी... तसंच इथं आणखीही काही प्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे उभारले जातात.
'बीबीसी'नं दिलेल्या वृत्तानुसार, कॅटेलूनियामध्ये १८ व्या शतकापासून ही परंपरा इथं सुरु आहे... 'शेम शेम' मूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मूर्तींमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचे पुतळे आपलं पोट हलकं करताना दाखवले जातात.
या पुतळ्यांना येणाऱ्या वर्षांत आशा-अपेक्षा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. यामध्ये कुणाचाही अपमान करण्याचा उद्देश मात्र नसतो.
एखाद्या झाडाच्या खाली ठेवण्यात येणारे हे पुतळे मातीपासून बनवले जातात.
फोर्ब्स मॅगझिनच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंधरावं स्थान दिलं गेलंय.
कॅटेलूनियाच्या या बाजारात यंदा अनेक पुतळ्यांमध्ये नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचाही समावेश झालाय. परंपरेनुसार या पुतळ्यांना लपवून ठेवलं जातं... आणि त्यांना शोधून काढण्यासाठी आपल्या मित्र-मंडळींना आणि आप्तेष्टांना बोलावलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.